Ad will apear here
Next
तन्मय दीक्षित यांना अमेरिकेचा ‘हॉल ऑफ फ्रेम’ सन्मान
तन्मय दीक्षितनाशिक : येथील सायबरतज्ज्ञ तन्मय दीक्षित यांना अमेरिकेतील ‘हॉल ऑफ फ्रेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनेटवर सुरक्षित असलेला डेटा हॅकरकडून चोरीला जाऊ शकतो, हे कायदेशीर पद्धतीने पटवून दिल्याबद्दल तन्मय दीक्षित यांना अमेरिकेतील सैन्यदलाचा ‘हॉल ऑफ फ्रेम’ सन्मान प्रदान करण्यात आला. 

अमेरिकेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या देशात हॅकर्सची संख्या वाढत चालली आहे. देशाची महत्त्वाची माहितीदेखील सुरक्षित नाही. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर सुरक्षेची गरज भासू लागली आहे.यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने सैन्यदल, बँका आदी विविध क्षेत्रात सायबर सुरक्षेवर भर दिला जात आहे. 

तन्मय दीक्षित गेली अनेक वर्षे सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहेत. अमेरिकेतील सैन्यदलाच्या माहितीच्या सुरक्षेबाबत त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना हा अत्यंत मानाचा ‘हॉल ऑफ फ्रेम’ सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZMJBY
Similar Posts
ऑडबनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघातर्फे गुरुवंदना कार्यक्रम ऑडबन (पेनसिल्व्हानिया) : अमेरिकेत मे महिना हा शिक्षकांच्या कार्याचे कौतुक (टीचर्स अॅप्रिसिएशन मन्थ) करण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने हिंदू स्वयंसेवक संघाच्या ऑडबन (पेनसिल्व्हानिया) शाखेने वार्षिक गुरुवंदना कार्यक्रम १९ मे रोजी आयोजित केला होता. वर्षभर शिक्षक विद्यार्थ्यांवर जी मेहनत
‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे! ही गोष्ट आहे आकांक्षा प्रभुणे या एका मराठी मुलीची. चित्रपट क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसूनही या क्षेत्रातच करिअर करण्याची आकांक्षा तिने जिद्दीने पूर्ण केली. अमेरिकेत या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिथे तिने फिल्ममेकर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे. ‘रिझॉल्व्ह’ या तिच्या शॉर्टफिल्मची
‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती! ज्यांनी लहानपणापासूनच घरचा गणेशोत्सव अनुभवलाय, ते नतर जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी बाप्पाच्या आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम राहतात. त्यामुळे ते जिथे कुठे असतील, तिथे गणेशोत्सव साजरा करतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नोकरी सांभाळून, स्वतः गणेशमूर्ती तयार करणारी वरदा राहुल पेठे
मनात घर करून राहिलेली अमेरिकेतली दिवाळी दिवाळीचा उत्साह सगळीकडेच अगदी ओसंडून वाहत असतो. त्यातूनही आपल्या देशापासून, घरापासून दूरवर परदेशात स्थायिक झालेल्या मराठी मनाला तर आपले सण साजरे करायची ओढ अधिकच तीव्र असते. त्यामुळेच तिकडेही दिवाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होती. ज्येष्ठ गायिका, संगीतकार मधुवंती पेठे लिहीत आहेत, त्यांनी अमेरिकेत आपल्या मुलाकडे अनुभवलेल्या दिवाळीच्या आठवणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language